Author: पराग गोडबोले

मोबाइल - 9323277620

शनिवारची सकाळ. नेहेमीप्रमाणेच लताबाई आली घरकामाला. ती आली आणि केर काढू लागली की, माझी नुसती तारांबळ उडते. इथे बसू का तिथे बसू? या खोलीत जाऊ का त्या खोलीत जाऊ? असे यक्षप्रश्न ठाण मांडून माझ्यासमोर उभे ठाकतात आणि मी बापुडवणा, पाय पोटाशी धरून बसून राहतो सोफ्यावर, नाही तर खुर्चीवर! खाली उतरायची बंदी असते मला, ती पंधरा मिनिटं… केर काढत असताना उतरलो आणि पाणी प्यायला जरी गेलो तरी, ‘नाचू नको केरात!! कितीही वेळा सांगितलं तरी, लक्षात कसं येत नाही तुझ्या?’ अशी टकळी सुरू होते. लादी पुसताना उतरलो तर, ‘पाय उठतात रे लादीवर, का अंत बघतोस माझ्या सहनशक्तीचा? नसतोस घरी तेच बरं असतं…’…

Read More