Author: डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

Avatar photo

पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

पायाला काच लागल्यानं टीटी इंजेक्शन घ्यायला आलेला एक इसम अत्यंत कावला होता… “ट्रे तुटला तेव्हा काल रात्रीच म्हटलं होतं, नीट साफ करा तर नाही! आता सकाळी सकाळी परेशानी… आधीच पाठ जाम, ॲाफिसचं टेन्शन आणि त्यात आता हा प्रकार… ब्ला… ब्ला…” त्यांचं आपलं सुरू होतं. दीड इंचाची जखम, त्यावर दोन रुपयाचं बँडेज आणि पन्नास रुपयांचं टीटी यामुळं इसमानं थेट आयुष्यावर वगैरे टीका करायला सुरुवात केल्याचं पाहून मोठी गंमत वाटली. असे पेशंट भेटले की, मला मार्था आठवते… मार्था मेसन… मार्था मेसनचा जन्म यूएसस्थित उत्तर कॅरोलिना इथं झाला. ती बालपणापासूनच तीन ‘ह’ अर्थात हुशार, हसरी आणि हजरजबाबी! ती अकरा वर्षांची असावी, तेव्हा तिचा…

Read More