Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
शोभा भडके भाग – 6 “आई आरुला काय झालं… ती रडत होती,” भावनाने डायनिंग टेबलजवळ बसत विचारलं. “काय, सकाळी सकाळी आरु रडत होती? आता काय केलंस पवन?” प्रकाशराव चेअरवर बसत पवनला रागवत म्हणाले. “बाबा मी काही नाही केलं…” पवन. “कसं तू काही नाही केलं? तूच तिला सारखं चिडवत असतोस…” नाश्त्याला सुरुवात करत भावना म्हणाली. “तू गप्प गं! …काय खायला सुरू केलंस लगेच? जा तिला घेऊन ये नाश्ता करायला… आणि हा दादा कुठे राहिला?” – पवन. “मी का जाऊ? तू रडवलंस, तू जा… मला लेट होतोय कॉलेजला जायला…” ती नाश्ता संपवत म्हणाली. या दोघांचा वाढता वाद पाहून आत्या मधे पडत म्हणाली,…
दिलीप कजगांवकर ‘शेखर, अजय, रमेश, राधा, मुग्धा अशा अनेक मित्र-मैत्रिणींना मेसेज आला… ‘शालेय मित्र-मैत्रिणी’ या ग्रुपमध्ये तुमचे स्वागत आहे!’ शाळा सोडून जवळजवळ 50 वर्षे झाली होती. शाळेनंतर पुढील शिक्षण, नोकरी, लग्न अशा विविध कारणांमुळे मित्र विखुरले गेले. काही मित्र आठवणीत होते तर, काहींचे फक्त नावच आठवत होते. कोण कुठे आहे, याची कल्पना नव्हती. कसे कोणास ठाऊक, पण राज नावाच्या मित्राने त्याच्या शाळेतील मित्रांचे फोन नंबर्स मिळवले आणि ‘शालेय मित्र-मैत्रिणी’ हा व्हॅाट्सअॅप ग्रुप तयार केला. ग्रुपमध्ये अनेक मेसेजेस येऊ लागलेत, मित्रांशी फोनवर बोलणे सुरू झाले. कुठे असतो? शाळेनंतर काय केले? नोकरी कुठे केली? लग्न कधी केले? बायको कुठली? की वर्ग मैत्रिणींपैकीच…
कामिनी व्यवहारे साहित्य हेही वाचा – Recipe: सुरणाची अशी भाजी टेस्ट केली आहे का? कृती हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का? टिप्स तयारी करण्यासाठी लागणारा वेळ – 30 ते 40 मिनिटे वडी तयार होण्यास लागणारा वेळ – 40 ते 50 मिनिटे तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी.
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः । कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन ॥46॥ जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ॥474॥ कां जिये एकी वस्तूलांगीं । बाणोनि ज्ञानाची वज्रांगी । झुंजत प्रपंचेंशीं समरंगीं । ज्ञानिये गा ॥475॥ अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥476॥ जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचे याज्य । एवं जें पूज्य । सकळां सदा ॥477॥ तेंचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाण…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास दिनविशेष मराठी संतसाहित्याचे चिकित्सक न. र. फाटक टीम अवांतर नामवंत पत्रकार, प्राध्यापक, मराठी संतसाहित्याचे चिकित्सक, इतिहाससंशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म 15 एप्रिल 1883 भोर येथील जांभळी गावात झाला. 1917 साली अलाहाबाद विद्यापीठातून ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बीए झाले. त्यानंतर काही काळ विविधज्ञानविस्तार, इंदूप्रकाश, नवाकाळ या नियतकालिकांच्या संपादनकार्यात त्यांनी भाग घेतला. ‘सत्यान्वेषी’ आणि ‘फरिश्ता’ या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीयलेखन केले. 1935 ते 1937 या काळात श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठ आणि त्यानंतर मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजमध्ये ते मराठीचे प्राध्यापक होते. 1957 साली ते याच कॉलेजमधून…
डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ मानवी शरीरात घडणाऱ्या जैविक प्रक्रियांपैकी पचनक्रिया ही सर्वात सूक्ष्म, परंतु अत्यंत महत्त्वाची असते. आपण जे अन्न खातो त्यातून शरीराला ऊर्जा, पोषकद्रव्ये आणि वाढीसाठी आवश्यक घटक मिळवण्याचे काम ही प्रक्रिया अखंडपणे पार पाडते. खाण्यानंतर पचनाची प्रक्रिया आपल्या तोंडापासून सुरू होते. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा आपल्या तोंडातील लाळ अन्नासोबत मिसळते. लाळेमध्ये काही एन्जाईम्स असतात जे अन्नातील कार्बोहायड्रेटचे विघटन सुरू करून पचनाची प्रक्रिया सुरू करतात. तोंडातील चवीची अनुभूती देखील पचनास मदत करते, कारण चव ओळखल्यानंतर शरीरात पचनासाठी आवश्यक रसायने तयार होतात. अन्न जितकं व्यवस्थित चावले जाते, तितकं पुढील अवयवांचा अन्न पचवण्याचा ताण कमी होतो आणि म्हणून जास्त…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे… हेही वाचा – Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. विवेक वैद्य ऑफिसला निघालो होतो. गावाबाहेर असलेल्या महादेवाच्या मंदिरात गेलो होतो. सध्या आयुष्यात काहीच ठीक चालले नव्हते… अशावेळी बरोबर देवाची आठवण येते. दुसऱ्या रस्त्याने गावात आलो तर, रस्त्याच्या एका बाजूला बायकांची भली मोठी रांग. अगदी अर्धा किलोमीटर तरी असेल! प्रथम लक्षातच आले नाही, ही कसली रांग? मग समजले सरकारतर्फे गरीब कष्टकरी महिलांना मोफत भांडेवाटप होते, त्याची ती रांग होती. अचानक रांगेत एक ओळखीचा पंजाबी ड्रेस दिसला. पुन्हा वळून पाहिले पण एवढ्या गर्दीत काही दिसेना, मोटरसायकल वळवून पुन्हा 100-150 फूट मागे गेलो. पुन्हा तोच ड्रेस दिसला. ड्रेस घातलेली तरुणी माझ्यापासून चेहरा लपवत होती. मी मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला लावली आणि शांतपणे…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय हा आरंभरंभेचा गौरवु । कीं वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रूपा आला ॥462॥ हा संसार उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचे दीप । जैसे परिमळेंचि धरिजे रूप । चंदनाचें ॥463॥ तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धभांडारींहूनि काढिला । दिसे तेणें मानें रूढला । साधकदशे ॥464॥ प्रयत्नाद् यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः । अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥45॥ जे वर्षशतांचिया कोडी । जन्मसहस्त्रांचिया आडी । लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ॥465॥ म्हणोनि साधनजात आघवें ।…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. कोणत्याही व्यक्ती, बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळेल. काही नवीन लोकांशी संपर्क होईल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. जोडीदाराकडून समाधानकारक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नफा पाहून तुम्हाला आनंद होईल. वृषभ – आजचा दिवस खूप धावपळीचा आणि दगदगीचा असेल. त्यामुळे जास्त काळजी घ्यावी लागेल. या काळात पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. दृढनिश्चयी स्वभाव आज फायदेशीर ठरेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. पैसे गुंतवायचे असतील तर ते काम आजच करा; भविष्यात चांगले फायदे मिळतील. मिथुन – आधीच आजाराने…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 510
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

