Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026

    कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा

    October 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा
    फूड काॅर्नर

    कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरOctober 16, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी लेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, माधवी जोशी माहुलकर, लेखिका माधवी जोशी माहुलकर, माधवी जोशी, माधवी माहुलकर, Recipe, कढईतील थालिपीठ, थालिपीठ परंपरा, समृद्ध वारसा, विदर्भ स्पेशल, तव्यावरील थालिपीठ, खमंग थालिपीठ, झटपट थालिपीठ, भाजणीचे थालिपीठ, थालिपीठाचा वारसा
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आयुष्य हे चुलीवरल्या कढईतील फक्त कांदा-पोह्यासारखे नसते, तर ते कढईतील थालिपीठासारखे सुद्धा असू शकते… असा विचार कढईत थालिपीठ थापताना माझ्या मनात आला. कारण, कोंड्याचा मांडा करण्याची आपल्या आई, आजीची ही कला घरातीलचं मोजके सामान वापरुन कुटुंबातील प्रत्येक माणसाचे मन जपायला शिकवते. कढईतील थालिपीठ हा असाचं एक जिव्हाळ्याचा पदार्थ आहे. कढईतले कांदे-पोहे जसे त्यातील तिखट, मीठाच्या चवीनुसार चांगले का वाईट ठरतात, तसेच हे कढईतले थालिपीठ त्याच्यातील पिठाच्या आणि मसाल्यांच्या मिश्रणावर तसेच खमंगपणावर आपली चविष्ट गुणवत्ता राखतात, असं मला वाटतं.

    माझी आजी, आई आणि सासूबाई देखील कढईतील थालिपीठ खूपच छान करायच्या. अर्थात, घरातील उरलेल्या अन्नाचा वापर करून असे चवदार पदार्थ तयार करण्यात या बायकांचा हातखंडा होता, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामध्ये शिळे खाणे चांगले किंवा वाईट, हा निकष महत्त्वाचा नसून तो चवदार पदार्थ आपल्याला वरचेवर खायला मिळावा, यावर जास्त भर असायचा.

    थालिपीठ हा पदार्थ फक्त शिळ्या वरणापासून किंवा भाजीपासूनच तयार होतो, असे नाही तर ताजे ताजे कांद्याचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ, मुळ्याचे थालीपीठ, कांद्याची पात वापरून केलेले थालिपीठ, अशी नवनवीन रुपे घेऊन कायम आपल्या समोर येते. गरमागरम थालिपीठ समोर आले की, मनावर ताबा ठेवणे केवळ अशक्य! भाजणीचे थालिपीठ वेगळे, परंतु ऐनवेळी थोडी कणिक, थोडे ज्वारीचे पीठ, थोडे बेसन वापरून केलेल्या या पदार्थाने तिखटमीठ, आले-लसणाची पेस्ट, कांदा, कोथींबीर, ओवा, जिरं, तीळ, धणेपुड, मीठ यांच्या सहाय्याने आपलं रूप खुलवून, कायम आपले मन जिंकले आहे. तव्यावरचे थालिपीठ आणि कढईतील थालिपीठ यात थोडा फरक असतो… ते थालिपीठ शेकण्याचा! कढईतील थालिपीठ हे खोलगट वर्तुळाकार पृष्ठभागावर केल्याने या थालीपीठाला सर्व बाजुने व्यवस्थित शेक लागून ते मस्त कडक आणि खमंग होतं, असं माझ मत आहे. काही पदार्थ हे भांड्यांच्या आकारमानावर सुद्धा अवलंबून असावेत. बहुतेक त्याच कारणामुळे भारतीय स्वयंपाकघरात विविध आकारांची भांडी, चमचे, पळ्या, कढया, हंड्या आढळतात.

    कढईतील तांदळाच्या पीठाचे थालीपीठ ही बेळगावची आयकॉनिक डिश आहे, असं म्हणतात. विदर्भात मात्र हे थालिपीठ मिश्र पिठांपासूनच तयार केले जाते, असा माझा अनुभव आहे. तांदळाच्याच पिठात लसणाच्या ओल्या पातीचा वापर करून धिरड्यांसारखा एक प्रकार आमच्याकडील नागपूर, भंडारा जिल्ह्यांत केला जातो; ज्याला ‘तांदळाच्या पिठाचे आक्षे’ असं म्हणतात. बाकी थालिपीठ म्हटले की, बहुतकरून ते गव्हाच्या पिठाचे, नाहीतर ज्वारीच्या पिठामध्ये इतर पिठं मिक्स करूनचं केले जाते. संध्याकाळच्या वेळेस पोळ्या कमी असतील किंवा काहीतरी चटकदार खाण्याची इच्छा असेल, तर कढईतील थालिपीठ हा मस्त पर्याय आहे. या थालिपीठासोबत लोणी, गोड दही, लिंबाचे लोणचे, शेंगदाण्याची चटणी तोंडी लावायला असली की, यासारखे सुख नाही. हा पदार्थ कोणी शोधून काढला या भानगडीत न पडता, तो सामान्य लोकांपासून ते उच्चभ्रू लोकांच्याही पसंतीस कसा उतरला, हे जास्त महत्वाचे आहे.

    हेही वाचा – जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    बिर्याणी हा पदार्थ मजूर किंवा कामगार लोकांच्या रोजच्या जेवणाचा भाग होता, परंतु तो मुघल बादशहाला आवडला आणि त्याच्या मुदपाकखान्यातील आचाऱ्यांनी वेगवेगळे मसाले तसेच ड्रायफ्रुट्स वापरून त्याला शाही बनवले, तसाच हा प्रकार आहे. कढईतील थालिपीठ असेच करता करता तव्यावरचे होत गेले असावे, कारण तव्याचा पृष्ठभाग किंचित खोलगट आणि कडेने सपाट असतो म्हणून ते थापायला सोपं जात असावं! कढईत थालिपीठ थापणे तसे कठीणच आहे, कारण सुरुवातीला थंड कढईत हे थालिपीठ कढईच्या सर्व बाजूने पातळसर थापले जातं, परंतु नंतर मात्र गरम कढईत दुसरं थालिपीठ लावणे कठीण जातं.  एकापेक्षा जास्त कढईतील थालिपीठ करायची असतील तर, दोन कढयांचा वापर करावा लागतो. एक थालिपीठ झाल्यानंतर ती कढई थंड होईपर्यंत दुसऱ्या कढईत थालिपीठ थापावे लागतं, तरचं कढईतील थालिपीठं भरभर होतात. माझी आई तर पोळ्यांना लावायची कणिक जर परातीत उरली तर, त्यामध्ये तिखट, मीठ, जिरं, तीळ वगैरे घालून त्याचं सरसरीत पीठ भिजवून, त्याची धिरडे करायची किंवा पटकन कांदा चिरून त्या कणकेमध्ये थोडे ज्वारीचे पीठ, बेसन वापरून कढईतील थालिपीठ करायची. कारण, एकदा वापरलेली कोरडी कणिक ती कणकेच्या डब्यात परत मिसळायची नाही; उरलेली कोरडी कणिक ठेवायला एक वेगळा डबा असायचा. यामागे काय कारण होतं तिचं तिलाच माहीत! परंतु तिचं पाहून आपल्यालाही तशीच सवय लागते. अर्थात, यामागे सोवळं म्हणण्यापेक्षा स्वच्छता असावी, असं मला वाटतं.

    हेही वाचा – माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    पुरणाची पोळी, भाकरी जसे महाराष्ट्रीयन गृहिणीला यायला हवेत, असा निकष मराठी घरांमध्ये होता किंवा काही ठिकाणी सध्याही आहे… तसाच मराठी मुलीला थालिपीठ यायला हवे, अशी आजही बहुतेकांची अपेक्षा असते. खमंग थालिपीठ करणे, ही एक कला आहे. भाजणीचे थालिपीठ तर बहुतेक सगळ्यांकडे होतच असते. परंतु ऐनवेळी कणकेसोबत इतर उपलब्ध पिठे वापरून हे कढईतील थालिपीठ करणे ही देखील एक पाककलाच आहे. फारशी चव नसलेल्या पिठांनी तिखटमीठ, जिरे, तीळ, ओवा, मिरच्या, कोथिंबीर टाकून कधी कांदे, तर कधी काकडी, दुधीभोपळा इत्यादी पदार्थांना आपल्यामध्ये सामावून घेत, सरमिसळ अनुभव असलेल्या आयुष्यासारखंच हे कढईतील थालिपीठ तावून, सुलाखून, चटके सहन करत आपल्या खाद्यपरंपरेतील खमंग गुणांचा वारसा घेऊन आपल्यासमोर जेव्हा येतं, तेव्हा त्याला नाकारणे आपल्याला जमतचं नाही. आयुष्य हे फक्त चुलीवरल्या कढईतील फक्त कांदे पोहे असू शकत नाही, तर ते कढईतील थालिपीठही असू शकते… कारण यामध्ये आपल्या आई, आजी, सासू यांच्या संसारातील तसेच त्यांच्या जीवनातील कडू, गोड, तिखट, खारट, अनुभवांच्या चवींचा वारसा उतरलेला आहे आणि त्यांच्या या वारशामुळेच पिढी दर पिढी आपलेही आयुष्य खमंग आणि समृद्ध होत गेले आहे.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    शारदीय नवरात्र, पेशवाई थाट आणि सुगंधी ‘केशरी भात’!

    October 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : ढाबा स्टाईल लसुणी पालक!

    October 9, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    शारदीय नवरात्र, पेशवाई थाट आणि सुगंधी ‘केशरी भात’!

    By माधवी जोशी माहुलकरOctober 12, 2026

    शारदीय नवरात्री हा भारतीय संस्कृतीतील अतिशय पवित्र, उर्जादायी आणि आनंदाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो.…

    Recipe : ढाबा स्टाईल लसुणी पालक!

    October 9, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल… टुट्टुमियाच्या शेंगांचे लोणचे!

    September 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026

    कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा

    October 16, 2026

    पत्रिकेतील ग्रह आणि वास्तू

    October 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बुद्धि मेचवेना धोंडीं, हा ठायवरी मवाळें सांडी

    October 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 ऑक्टोबर 2026

    October 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 472
    • अवांतर 217
    • आरोग्य 159
    • पंचांग आणि भविष्य 632
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 996
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026

    कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा

    October 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.