Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»आजचे पंचांग आणि दिनविशेष : 25 मे 2025
    वास्तू आणि वेध

    आजचे पंचांग आणि दिनविशेष : 25 मे 2025

    Team AvaantarBy Team AvaantarMay 25, 2025Updated:March 18, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

     

    आज, भारतीय सौर : 4 ज्येष्ठ शके 1947

    अर्थात,

    दिनांक : 25 मे 2025

    वार : रविवार

    तिथि : त्रयोदशी 15:52

    नक्षत्र : अश्विनी 11:12

    योग : सौभाग्य 11:06

    करण : विष्टी 26.02

    सूर्य : वृषभ

    चंद्र : मेष

    सूर्योदय : 06:01

    सूर्यास्त : 19:09

    पक्ष : कृष्ण पक्ष

    मास : वैशाख

    ऋतू : वसंत

    सूर्य अयन : उत्तरायण

    संवत्सर : विश्वावसू

    शालिवाहन शक : 1947

    विक्रम संवत : 2081

    युगाब्द : 5127

    शिवरात्री


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    व्यायामविद्येचे जनक माणिकराव

    आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे जनक गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव यांचा जन्म 31 डिसेंबर 1878 रोजी बडोदे येथे झाला. वस्ताद जुम्मादादांचे शिष्य आणि अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव असा त्यांचा लौकिक होता. माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक तसेच शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये त्यांनी गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. लाठी, लेझीम, फरीगदगा, लकडी, बनेटी, जोडी, असे देशी खेळ आणि त्याच्या जोडीला व्यायाम प्रकारांचे शास्त्र निर्माण करून माणिकरावांनी याला सांघिक व्यायामाचे स्वरूप प्राप्त करून दिले. दोन्ही राज्यांचा विचार करता, सैनिकी संचलन तसेच कवायतींसाठी त्यांनी हिंदी आज्ञाशब्द बनवले. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माणिकरावांना बडोदा सरकारने ‘राजरत्न’ आणि ‘राजप्रिय’ अशा पदव्यांनी गौरवले. बडोद्याच्या ‘लक्ष्मीविलास’ राजवाड्यात भव्य शस्त्रसंग्रहालय उभारणाऱ्या माणिकरावांनी ‘प्रतापशस्त्रागार’, ‘भारतीय व्यायाम’ हे ग्रंथ लिहिले. 25 मे 1954 रोजी त्यांचे निधन झाले.

    अग्रणी क्रांतिकारी रासबिहारी बोस

    रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी क्रांतिकारकांपैकी एक. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचा जन्म बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील सुबालदह गावात 25 मे 1886 रोजी झाला. क्रांतिकारक जतीन मुखर्जींच्या नेतृत्वाखालील युगांतर नामक क्रांतिकारक संघटनेचे अमरेंद्र चॅटर्जी यांच्याशी रासबिहारी बोस यांची ओळख झाली. अशाप्रकारे ते बंगालमधील क्रांतिकारकांशी जोडले गेले. 1912च्या मध्यास त्यांनी बंगाल-चंद्रनगरला जाऊन बंगाली तसेच पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हाइसरॉयवर बॉम्ब टाकण्याची योजना आखली. 22 डिसेंबर 1912ला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे भारताची राजधानी सुरू करणार होते. आदल्या दिवशी रासबिहारी डेहराडूनहून तर, त्यांचे मित्र बसंतकुमार लाहोरहून दिल्लीला आले. दुसर्‍या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हाइसरॉयसाहेबांवर बसंतने बॉम्ब फेकला. हार्डिंगना गंभीर इजा झाली. अनेक भाषांवर प्रभुत्व, हजरजबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी असल्यामुळे रासबिहारी पुढे काही महिने पंजाब, बनारस, चंद्रनगर येथे राहिले. शेवटी जून 1915मध्ये ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले. तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी क्रांतिकार्य चालू ठेवले. अशा या महान क्रांतिकारकाचे 21 जानेवारी 1945 रोजी निधन झाले.

    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • ललित 499
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn