Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पहिला पाऊस आणि भिजायची हौस
    ललित

    पहिला पाऊस आणि भिजायची हौस

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेOctober 14, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, सतीश बर्वे, लेखक सतीश बर्वे, पहिला पाऊस, आजी आजोबा, आजी आजोबांचे प्रेम, आजी आजोबांचे कॉलेज जीवन, निवृत्तांचे आयुष्य, ज्येष्ठ नागरिकांचे दु:ख, माणूसपण जपणारे आजीआजोबा,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आज ड्रॉइंगरूमच्या स्लाइडिंग विंडोजवरच्या संगमरवरी कठड्यावर बसून, वाफाळलेला चहा पित, रिमझिम बरसणारा पहिला पाऊस बघताना, ते आजी-आजोबा मला नेहमी आठवतात…

    काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एका तातडीच्या कामासाठी मला अचानकपणे कोसळणाऱ्या पहिल्या पावसात गाडी काढून बाहेर पडावे लागले होते. आकाशात दाटून आलेले ढगांचे तांडव सुरू होते अन् त्यामुळे रस्त्यावर तुरळक वर्दळ होती. पुढे एका चौकात काही कारणाने वाहतूक कोंडी झाली होती. अर्धा तास उलटून देखील परिस्थिती ‘जैसे थे’ होती. मी कंटाळून गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी म्हणून मी गाडीतून उतरत असतानाच ते दोघे मला एकाच छत्रीत माझ्या गाडीजवळ येताना दिसले.

    गाडी लॉक करून मी निघणार इतक्यात ते दोघे माझ्याजवळ आले. त्यांना बघता क्षणीच मला हसू आलं. आजी-आजोबा एकाच छत्रीत पावसाची मजा घेत होते चक्क! मी न राहवून त्यांना विचारले,

    “आजोबा इतक्या पावसात का बाहेर पडलात?”

    त्यांच्या उत्तराने मला सुखद धक्का बसला आणि त्यांच्यातील प्रेमाचं भव्यदिव्य रूप मला दिसले.

    “बेटा आमची पहिली ओळख पावसात चिंब भिजून झाली होती.”

    आजोबा पार त्यांच्या तरूणपणात जाऊन पोहोचले होते…

    “त्या दिवशी कॉलेजला जायला निघालो होतो छत्री घेऊन. बस स्टॉपवर ही उभी होती भिजलेली. मला ही मनापासून आवडायची. मनात म्हटलं आज देवाने अखेर माझं ऐकलेले दिसतंय. मी तिच्या जवळ जाऊन – ‘येतेस का?’ म्हणून विचारले.”

    हेही वाचा – लढाई… व्यवहार की भावना?

    इतक्यात आजी बोलल्या, “हा नेहमी माझ्याशी बोलण्याची संधी शोधणारा मुलगा मला देखील आवडायचा. मला बघून याची जी अवस्था झाली होती, अगदी तशीच अवस्था माझी झाली होती!”

    “अच्छा म्हणजे आग दोन्ही बाजूला लागली होती,” मी आजोबांना म्हणालो.

    त्यावर ते दोघेही हसायला लागले.

    “बेटा त्या पावसाची गुलाबी आठवण नव्याने जगण्यासाठी आम्ही दरवर्षी पहिल्या पावसात असे बाहेर पडतो.”

    “चला आपण समोरच्या रेस्टॉरंटमध्ये बसून बोलू या. आजीदेखील खूप भिजल्या आहेत.”

    चालता चालता आजोबांनी एक गुगली टाकली. ते म्हणाले, “अरे, ती चिंब भिजली की, मला अगदी चिकटून चालते. खूप रोमॅंटिक वाटतं तेव्हा… आम्हाला जवळ आणणारा हा पाऊस आमच्यासाठी देव आहे!”

    रेस्टॉरंटमध्ये गरम गरम वाफाळलेला चहा आणि कुरकुरीत कांदा, बटाटा भजी खाताना ते दोघंही एका वेगळ्याच विश्वात रमले… जणूकाही रंगमंचावरचा सेट बदलल्यासारखं.

    आजोबा अचानक गंभीर झाले आणि कोसळणाऱ्या पावसाप्रमाणे त्यांच्या सहजीवनाचा सारीपाट माझ्यासमोर उलगडून ठेवला… आज काल बऱ्यापैकी ऐकू येतं तसंच वरिष्ठ नागरिकांचं दुःख आजी-आजोबांच्या वाट्याला आले होते. दोन उच्चशिक्षित मुलं. पण दोघेही परदेशात सेटल झालेली. त्यांची भारतात परतायची आशा आजी-आजोबांनी कधीच सोडून दिली होती. सुदैवाने ते दोघे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते आणि दोघांच्या पेंशनमध्ये ते आनंदाने जगत होते.

    आजी-आजोबांचं मला खरंच कौतुक वाटत होते ते… त्यांच्या आयुष्य जगण्याच्या सकारात्मकतेकडे बघून! त्याचं पुत्र-वियोगाचे दुःख ते कधीच कुरवाळत बसले नाहीत आजवर. उलट, ती गोष्ट जणूकाही घडलीच नाही, असं समजून उगवणारा प्रत्येक दिवस ते दोघे एकमेकांच्या आधाराने आनंदाने जगत होते, त्यांच्या मालकीच्या छोटेखानी बंगल्यात. दोघांच्याही तब्येती ठणठणीत होत्या. निवृत्तीनंतर भारतभर खूप भटकंती केली दोघांनी.

    आता मात्र त्यांचा बंगला बनला आहे, निवृत्तांच्या गप्पांचा अड्डा. सकाळी 10-15 निवृत्त आजी, आजोबा तिथे गप्पा मारायला येतात. दुपारी आणि संध्याकाळी आजी-आजोबा शाळेच्या छोट्या मुलांसाठी संस्कार वर्ग चालवतात. छोटे छोटे खेळ खेळत आजी-आजोबा एकमेकांना मदतीची, आधार देण्याची आणि माणुसकीची शिकवण नकळत देऊन जातात. संध्याकाळ झाल्यावर स्तोत्रं म्हणून घेतात, सगळ्या इवल्याशा दोस्तांकडून बोबड्या आवाजात…

    “आपले सगळे सण आम्ही तिथे मोठ्या उत्साहात साजरे करतो. आमचा बंगला आता सार्वजनिक झाला आहे. जवळच्या कॉलेजची मुलं-मुली आजीने फुलवलेली बाग बघायला येतात नेहमी. ती सगळी आता आमची नातवंडे झाली आहेत…” आजी कौतुकाने सांगत होती.

    “बेटा, येणं आणि जाणं आपल्या हातात नाही, हे जरी खरं असलं तरी, आपण इतरांना आपल्या आनंदात आणि समाधानात सामावून घेत जगलं पाहिजे, असे आम्हाला दोघांनाही वाटते. हीच शिकवण आम्ही आमच्या मुलांना दिली. पण आज स्वतःची अफाट आर्थिक भरभराट करून देखील त्यात आम्हा दोघांना सामावून घ्यायची, त्यांची बिलकुल इच्छा नाही… हे कटू सत्य आम्ही केव्हाच पचवले आहे आणि म्हणूनच आयुष्याच्या या संधिप्रकाशात आम्ही दोघेही आनंदाचे आणि समाधानाचे प्रखर दिवे लावून जगत आहोत…”

    आजोबा पुढे बोलता बोलता बरंच काही सांगून गेले. जणूकाही ते मलाच सुचवत होते आयुष्य जगण्यासाठी सदैव स्मरणात ठेवण्याच्या गोष्टी…

    पाऊस जवळपास थांबल्यावर मी त्या दोघांना त्यांच्या बंगल्यावर सोडून आलो. दारातच त्यांचे दोन कुत्रे त्यांची वाट बघत होते. त्यांना बघताक्षणी त्यांच्या अंगावर उड्या मारत जणू त्यांनी त्यांची काळजी आणि प्रेम व्यक्त केले.

    हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’

    निघताना मी दोघांनाही वाकून नमस्कार केला. आजीचे डोळे पाणावले होते. आजोबांनी मात्र घट्ट मिठी मारून आशीर्वाद दिला… म्हणाले, “मुलगा म्हणून आणि बाप म्हणून तुझी जी कर्तव्य आहेत, ती कसोशीने पाळ आणि पुण्यवान हो. इतरांच्या आयुष्याच्या सारीपाटावर आपल्या आयुष्याचे फासे फेकायचे असतात; पण ते गोळा करताना इतरांना तसूभरही दुःख होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते, हे कधीही विसरू नकोस. तुझी भूमिका कायम हसतमुख राहून पार पाडत राहा, तरच मोठ्यांच्या आशीर्वादाच्या आणि लहानांच्या कौतुकाच्या टाळ्या तुला कायम ऐकायला मिळतील शेवटपर्यंत.”

    आजोबांनी सांगितलेली गोष्ट मी आजपर्यंत सतत न विसरता अमलात आणली आहे आणि म्हणूनच मुलगा आणि बाप या दोन्ही भूमिकेत मी ‘नटसम्राट’ म्हणून वावरत आहे.

    आज आजी-आजोबा दोघेही हयात नाहीत. पण पहिल्या पावसाच्या सरी बरसायला लागल्या की, त्या दोघांची आठवण आल्याशिवाय रहात नाही…

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026 ललित

    बापाची माया..

    October 14, 2026 ललित

    विश्वास

    October 13, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    By दीपक तांबोळीOctober 14, 2026

    भाग – 3 मेसचा डबा न आल्याने चव्हाण नव्या मेसच्या चौकशीसाठी शेजारच्या कुलकर्णींकडे गेले होते.…

    बापाची माया..

    October 14, 2026

    विश्वास

    October 13, 2026

    लॉकडाऊन

    October 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026

    पहिला पाऊस आणि भिजायची हौस

    October 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सांग पां धनुर्धरा, रावो रायपणें डोंगरा

    October 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑक्टोबर 2026

    October 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 469
    • अवांतर 217
    • आरोग्य 158
    • पंचांग आणि भविष्य 629
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 259
    • मैत्रीण 31
    • ललित 993
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.