Thursday, March 12, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

साहित्य

  • चण्याचे पीठ – दोन वाट्या
  • कणीक – एक वाटी
  • सुक्या खोबऱ्याचा किस – एक वाटी
  • खसखस – अर्धी वाटी
  • तीळ – पाव वाटी
  • कोथिंबीर – एक वाटी (बारीक चिरलेली)
  • तिखट – चवीनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – चवीनुसार
  • हिंग – अर्धा टीस्पून
  • काळा मसाला – एक टीस्पून
  • तेल – तीन वाटी
  • चिंच – मोठ्या बोराएवढी

हेही वाचा – Recipe : तंदुरी पनीर कबाब अन् कुरकुरीत भेंडी

कृती

  1. चण्याचे पीठ आणि कणीक एकत्र मिसळावी आणि त्यात चवीनुसार मीठ घालावे.
  2. पाव वाटी तेलाचे मोहन आणि पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे.
  3. खोबरे, तीळ आणि खसखस भाजून घ्यावे.
  4. खोबरे हाताने जरा चुरडून घ्यावे. तीळ कुटून घ्यावेत.
  5. खोबरे, खसखस आणि तीळ एकत्र करून, त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून सारण तयार करावे.
  6. अर्धी वाटी तेल घेऊन, त्यात चिंच आणि काळा मसाला घालून, अगदी बारीक वाटावे.
  7. नंतर भिजविलेल्या पिठाच्या गोळ्या लाटाव्या.
  8. तेलात वाटलेला मसाला सर्व पोळीला लावावा आणि तयार केलेले सारण त्यावर पसरून चिरोट्याच्या पोळीप्रमाणे या पोळीच्या घड्या घालाव्या.
  9. पोळीची शेवटची कड पाण्याचा हात लावून बंद करावी.
  10. नंतर ती घडी तव्यावर थोडी गरम भाजून घ्यावी आणि नंतर तळणीतून तांबूस रंगावर तळून काढावी.
  11. नंतर आवडीप्रमाणे त्याच्या लहान मोठ्या वड्या कापाव्या.

हेही वाचा – Recipe : अशी वरी तांदळाची खिचडी करून पाहिली आहे का?

टिप

  • डाळीच्या पिठाची मोदकाप्रमाणे उकड करून आणि त्यात वरीलप्रमाणे कणीक मिसळूनही बाकर वड्या केल्या जातात.
  • या बाकर वड्या चवीला जास्त चांगल्या लागतात. मात्र तळण्यासाठी त्याला तेल जास्त लागते.
  • तसेच या वड्या करताना कणीक घातली नाही, तरी चालते.

(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)


तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर,

avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा.

या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!