Sunday, February 22, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 फेब्रुवारी 2026

Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 फेब्रुवारी 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 22 फेब्रुवारी 2026; वार : रविवार
  • भारतीय सौर : 03 फाल्गुन शके 1947; तिथि : पंचमी 11:10; नक्षत्र : अश्विनी 17:54
  • योग : शुक्ल 13:08; करण : कौलव 22:10
  • सूर्य : कुंभ; चंद्र : मेष; सूर्योदय : 07:04; सूर्यास्त : 18:40
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660

हेही वाचा – योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य


दिनविशेष

‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ कार डॉ. लक्ष्मण देशपांडे

टीम अवांतर

‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ कार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म 5 डिसेंबर 1943 रोजी झाला. एम.ए., पीएचडी, मास्टर ऑफ ड्रामॅटिक्स अशा पदव्या संपादन केलेल्या डॉ. देशपांडे यांनी आपल्या कारकीर्दीत तब्बल 23 नाट्य महोत्सवांचे आयोजन केले होते. 200 पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवायच्या याचे शिक्षण दिले. सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर रेशीमगाठी आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत पैंजण अशा दोन चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका देखील केल्या. ‘प्रतिकार’ हे त्यांचे एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले. ‘मौलाना आझाद-पुनर्मूल्यांकन’ या पुस्तकाचे, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अक्षरनाद या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले.

हेही वाचा – स्वभाव बदल… वयानुसार की, परिस्थितीनुसार?

तीन छोटे दिवे, तीन माईक आणि एक पंचा एवढ्या साहित्याच्या मदतीने 1980 मध्ये त्यांनी तब्बल 52 व्यक्तिरेखा असलेले मात्र एकपात्री असे ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ रंगभूमीवर आणले आणि या नाटकाने इतिहास घडवला. एकंदर विविध वयोगटातील 52 स्त्री-पुरुषांचे आवाज आणि त्याचवेळी कमीत कमी पण तरी प्रभावी हालचाली, हे या नाट्यप्रयोगाचे वैशिष्ट्य होते. मराठवाड्याच्या ग्रामीण जीवनशैलीतून आलेल्या या पात्रांचा प्रयोग केवळ मराठवाड्यातच नव्हे तर, महाराष्ट्र, भारत आणि परदेशातील नाट्यरसिकांना प्रचंड भावला. ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये याची दोनदा दखल घेतली गेली. लेखन, दिग्दर्शक आणि अभिनय अशा तिन्ही आघाड्या डॉ. देशपांडे यांनी एकहाती सांभाळल्या होत्या. ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ या एकपात्री नाटकात तब्बल 52 पात्रे एकट्याने साकारण्याची किमया त्यांनी साधली.

त्यांच्या या मेहनतीची दखल घेत 1996 मध्ये ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ ने पहिल्यांदा त्यांचा गौरव केला. याशिवाय, परदेशात ज्या ज्या देशांमध्ये मराठी नाट्य रसिक रहातो अशा जवळपास सगळ्याच

देशांमध्ये ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ चे प्रयोग झाले. या नाटकाचे जवळपास 3 हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. नाटकांच्या प्रयोगांमधून मिळालेली रक्कम बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटल, नाशिक येथील अंध शाळा आणि इतरही अनेक संस्थांना दान केली.

तर, 2000 मध्ये परभणी येथे पार पडलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला तर 2004 सालचा विष्णुदास भावे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय अनेक स़स्थांचे पुरस्कार आणि सन्मान त्यांना मिळाले होते. अशा या कलंदर व्यक्तिमत्त्वाचे 22 फेब्रुवारी 2009 रोजी निधन झाले.


विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!